Logo

फार्मर आयडी / शेतकरी ओळखपत्र

blog details

11 Dec 2024

फार्मर आयडी / शेतकरी ओळखपत्र

कृषी क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्याच्या हेतूने एक मोठे पाऊल म्हणून सरकार शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणे युनिक ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्याला शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी असे म्हणतात.

शेतकरी ओळखपत्रासाठी आवश्यक पात्रता

- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा 

- शेतकऱ्याकडे जमिनीचा मालकी हक्क असावा

- शेतकऱ्याचे नाव  ७/१२ उताऱ्यावर असणे आवश्यक


उद्देश आणि फायदे:

  • यामुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होईल
  • शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती फार्मर आयडी मध्ये एकत्र केली जाईल
  • त्यामुळे कोणत्याही शेतीविषयक योजनेच्या फॉर्म भरताना सोयीस्कर होईल.
  • सर्व माहिती एकत्र असल्यामुळे यापुढे सर्व ठिकाणी सर्व कागदपत्र देण्याची गरज पडणार नाही
  • भविष्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक 
  • सध्या तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर त्यासाठी यापुढे फार्मर आयडी असणे आवश्यक उदाहरणार्थ PM किसान योजना, पिक विमा, किसान क्रेडिट कार्ड इ.
  • थोडक्यात शेतकरी ओळखपत्र च्या माध्यमातून शेती क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो. 
  • शेतकरी योजनांमधून लोन सारख्या सेवेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक


शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्र:

  • आधार कार्ड 
  • ७/१२ उतारा 
  • बँक पासबुक 
  • आधार ला लिंक असलेला मोबाईल नंबर 


शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी जवळच्या CSC सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्राला भेट द्या सविस्तर माहिती जाणून घ्या आणि तुमचा फॉर्म भरा.


अशाच प्रकारच्या शासकीय आणि निमशासकीय सेवा व सुविधा, सरकारी योजना, सरकारी आणि प्रायव्हेट नोकरी विषयक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून आमच्या प्रायव्हेट कम्युनिटी🤝 मध्ये जॉईन व्हा. 

JOIN NOW 

टिप: ही प्रायव्हेट कम्युनिटी असल्यामुळे तुमचा नंबर ॲडमिन व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला दिसणार नाही. त्यामुळे निश्चिंत रहा.

धन्यवाद !




shape shape

Get to know more!